भुसावळ येथे विद्युत लोको शेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी


भुसावळ (प्रतिनिधी) – येथील रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता चाणक्य जैन उपस्थित होते.
यावेळी चाणक्य जैन यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. “छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्प सैन्य आणि मर्यादित साधनसामग्री असूनही दूरदृष्टी, शौर्य आणि युक्तीच्या जोरावर स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे आपणही नियोजन, प्रामाणिकपणा आणि संघभावनेच्या बळावर रेल्वेच्या प्रगतीसाठी कार्य केले पाहिजे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमास ललित भारंबे, निलेश इंगळे, सुशील पगारे, राजीव कुमार सिंग, जयेश ढाकणे, राहुल राजपूत, ललित मुथा, योगेश माळी, संजय चौधरी, मोहन राजपूत, शैलेश पाटील, विशाल सपकाळे, चेतन तायडे, रंजीत चौधरी, भूपेश घोलप, नागसेन यशोदे, विजय पाटील यांच्यासह विद्युत लोको शेडमधील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगानाने करण्यात आला.

फोटो कॅप्शरन – भुसावळ येथील रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये शिवजयंती निमित्त उपस्थित चाणक्य जैन,ललित कुमार मुथा,ललित भारंबे,राजीव कुमार सिंग,रणजीत चौधरी,राहूल राजपूत आदी