शशिकांत हिंगोणेकर यांचा”उत्तरार्ध” अंतर्बाह्य आंतरिक चिंतनशील –

प्रा. डाॅ.कीर्तीकुमार मोरे
  

जळगाव (प्रतिनिधी )-

शशिकांत हिंगोणेकर यांचा ५१वा कवितासंग्रह “उत्तरार्ध” याचे प्रकाशन आज जळगाव येथे प्राईम पब्लिशिंग हाऊसतर्फे उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक डॉ. कीर्तीकुमार मोरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रसंगी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालय, अमळनेर चे प्रा. डॉ. ज्ञानेश्वर कांबळे (आंबेडकरी साहित्य अभ्यासक), प्राईम पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक प्रदीप पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथील संशोधन सहाय्यक राजू रणवीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रकाशन सोहळ्यात बोलताना डॉ. कीर्तीकुमार मोरे यांनी हिंगोणेकर यांच्या कवितेचा प्रवास “युद्ध सुरू आहे” पासून “उत्तरार्ध” पर्यंत संघर्षशील, युद्धरत आणि अंतर्बाह्य चिंतनशील असा असल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या कवितेत सामाजिक भान, वैचारिक तीव्रता आणि अंतर्मुखता यांचा संगम आढळतो, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे आयोजन प्राईम पब्लिशिंग हाऊस, जळगाव यांनी केले होते. उपस्थित मान्यवरांचे आभार प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापक कृष्णा पाटील यांनी मानले.