भुसावळचे सुपुत्र ॲड. सागर सरोदे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव; सामाजिक कार्याची दखल :

भुसावळ (प्रतिनिधी) – सामाजिक क्षेत्रातील निरंतर आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत भुसावळ येथील सुपुत्र ॲड. सागर सतीश सरोदे यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. भुसावळ येथील या युवा वकिलाच्या कार्याचा गौरव जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे आयोजित भव्य सोहळ्यात करण्यात आला.

हा कार्यक्रम जनमत प्रतिष्ठान आणि मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

मान्यवरांची उपस्थिती ……

या सन्मान सोहळ्यास राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये जळगाव आमदार राजू मामा भोळे , जळगाव महापौरदीपमाला काळे नगराध्यक्ष, भुसावळ गायत्रीताई भंगाळे भुसावळ , माजी महापौर जयश्रीताई महाजन , निलकंठ गायकवाड , प्रा. रफिक शेखपंकज नाले संस्थापक अध्यक्ष, जनमत प्रतिष्ठान, मुकुंदा रोटे (मनसे जिल्हाध्यक्ष) , भारतीताई काळेl, विजय पवार (शिक्षण विस्तार अधिकारी)ॲड. निखिल पाटील या मान्यवरांच्या हस्ते ॲड. सागर सरोदे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

सामाजिक कार्याचा गौरव

ॲड. सागर सरोदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, वंचित घटकांना न्याय मिळवून देणे तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविणे या त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी भावना व्यक्त करत सांगितल की, त्यांनी
हा पुरस्कार म्हणजे माझ्या सामाजिक जबाबदारीची पावती आहे . भविष्यातही वंचितांच्या न्यायासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी माझे कार्य अधिक जोमाने सुरू राहील असा ठाम विश्वास ॲड. सागर सरोदे

या यशामुळे भुसावळ शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सामाजिक क्षेत्रात कार्यरत युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.