भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील लक्ष्मी माता चौक जवळील श्रीराम मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त रविवारी सकाळी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरिता चौक यांच्या हस्ते पूजा, अभिषेक व महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास राधेश्याम लाहोटी, जे. बी. कोटेचा, गोपाल चांडक, विनोद शर्मा, सत्यनारायण शर्मा, अनुप अग्रवाल, दिलीप लोंढे, सुभाष शिरसाळे, राजू गुरव, गणेश गुरव, शुभम गुरव, प्रशांत भोंडे, धनराज व्यवहारे, विमल कोटेचा, अरुणा अग्रवाल, धनश्री जोशी, विशाखा नाईक, कविता नाईक, मनिषा इखे, रुपाली महाजन, स्मिता दुसाने, निर्मला चौधरी, मंगला कुळकर्णी, मेघा कुरकुरे, सुविता चौक, लक्ष्मी पाटील, भारती पाटील, मालती पाटील, शोभा गुरव, पूजा गुरव यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.


