भुसावळ (प्रतिनिधी ) – ताप्ती पब्लिक सिबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी अनन्या प्रशांत जैन हिने कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

जेकेए इंडिया तर्फे आयोजित १० वी वरिष्ठ व कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कराटे स्पर्धा गुवाहाटी येथे पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भुसावळच्या ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
अनन्या प्रशांत जैन हिने चॅम्पियनशिपमध्ये ‘काता’ प्रकारात सुवर्णपदक, तर ‘कुमिते’ प्रकारात रौप्यपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले. अवघ्या बाराव्या वर्षी तिने ही उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या जिद्द, सातत्य आणि कठोर परिश्रमांची प्रचीती दिली.
या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या Nina Cutler यांनी अनन्याला प्रमाणपत्र देऊन शाळेतर्फे सन्मानित केले. तिच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांनी इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी उपप्राचार्या श्रद्धाली घुले, मनप्रीत कौर अरोड़ा, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनन्याच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अनन्या जैन हिला सन्मानित करताना प्रिन्सिपल निना कटलर.


