फैजपूर (प्रतिनिधी ) –
येथील जे. टी. महाजन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नुकतीच ” उद्योजकता विकास आणि स्टार्टअप ” या विषयावर उद्योजकता तज्ज्ञ व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ता म्हणून ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे येथील वरिष्ठ प्रा. राजेश रुपचंद वाघुळदे ( इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग तसेच आय आय इ डी सी चे समन्वयक ) उपस्थित होते. त्यांना २५ वर्षांहून अधिक शैक्षणिक अनुभव असून संशोधन, पेटंट्स व विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यशाळे दरम्यान विद्यार्थ्यांना उद्योजकता, नवकल्पना, स्टार्ट-अप संधी व उद्योग क्षेत्रातील व्यावहारिक अनुभवाबाबत प्रा. वाघुळदे यांनी सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायिक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यशाळेअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. तांत्रिक उपक्रमात मेकॅनिकल च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या संघात जयेश बाउसकर, गुंजन पाटील, अनस खान, दिपक पाटील व किर्तेश चौधरी यांचा समावेश होता.
तर अतांत्रिक उपक्रमात संगणक अभियांत्रिकी वर्गातील विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक (रनर-अप) मिळवला. या संघात अश्विनी पाटील, चेतना पाटील, खुशबू तळेले, सुमेधा पाटील व मानसी पाटील सहभागी होते. या उपक्रमाचे समन्वयक ए. एस. कोळी होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री. पी. एम. राणे सर होते. यावेळी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. सदर व्याख्यान आणि कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.




