भुसावळ(प्रतिनिधी ) -तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात साकेगाव क्रिकेट स्पर्धेचे नाव उत्कृष्ट आयोजनाबाबत घेतले जाते २०१५ पासून या गावात सातत्याने क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धा होत आहे. यंदा साकेगाव प्रीमियर लीग अर्थात एस पी एल -२ सीजनसाठी नुकतेच ऑक्शन पद्धतीने खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. गावातील ८ संघमालकांनी खेळाडूंना पॉईंट्स नुसार विकत घेतले. आता या स्पर्धेला ४ तारखेपासून महामार्गावरील जि प शाळेच्या मैदानावर सुरुवात होणार आहे.

स्पर्धा व्यवस्थित पार पाडावी याकरिता एसपीएस कमिटीतर्फे विविध समित्या गठित करण्यात आलेले आहे. विविध समित्या आपल्यावर दिलेली जबाबदारी पाडताना दिसत आहे.
१५० खेळाडूंचा कसून करताय सराव
दिमाखदार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण युट्युब वरून करण्यात आले.गावातील शंभर पेक्षा जास्त खेळाडूंचा आठ संघमालका द्वारे पॉईंट द्वारे खरेदी करण्यात आल्या त्या आधीपासून गावातील तब्बल दीडशे पेक्षा जास्त खेळाडूंनी सकाळ व संध्याकाळ मैदानावर घाम गाळायला सुरुवात केलेली आहे आपला संघ जिंकावा यासाठी स्पर्धेतील विविध संघ हे रणनीती आखताना दिसून येत आहे. याशिवाय सोशल मीडियावर एसपीएसपीएल ऑर्गनायझिंग कमिटी, संघमालक असे ग्रुप देखील करण्यात आलेले आहे.
गावातील विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची सवय लागावी, मोबाईल पासून लांब रहावे, मैदानावर घाम घडावे गावाचे नावलौकिक करावा या उद्देशातून साकेगाव क्रिकेट प्रेमीकडून दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
स्पर्धेचेही थेट प्रक्षेपण
स्पर्धेचे युट्युब वर लाईव्ह थेट प्रक्षेपण होणार आहे स्पर्धेचे नुकतेच मैदानावरस लोॅटस टाकण्यात आले, सहभागी संघाचे मॅचेसचे शेड्युल जाहीर करण्यात आल्यानंतर गावात स्पर्धेच्या चर्चेला आणखीनच उधान आले आहे
क्रिकेटपटूंची गावात डीजेसह रॅली
गावातील महामार्ग पलिकडील दत्त मंदिरात खेळाडूंना कलर किट वाटप करण्यात आले, यासह आयोजन कमिटीला ही किट वाटप करण्यात आले .येथूनच गावातील मुख्य चौकातून डीजेच्या तालावर क्रिकेट प्रेमींनी रॅली काढली होती यात खेळाडूंचा ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला होता. रॅलीचे समारोप जि प शाळेच्या मैदानावर झाले.


