भुसावळ (प्रतिनिधी)-
प्रवाशांची वाढती संख्या तसेच त्यांच्या सोयीसुविधांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने साईनगर शिर्डी – बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वेसेवेच्या संचालन कालावधीत वाढ केली आहे.
गाडी क्रमांक 04716 साईनगर शिर्डी – बीकानेर साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी 01 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालविण्यात येणार होती. आता ही रेल्वे 01 मार्च 2026 पर्यंत चालविण्यात येणार आहे.
तसेच, गाडी क्रमांक 04715 बीकानेर – साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष रेल्वे ही पूर्वी 31 जानेवारी 2026 पर्यंत अधिसूचित होती. तिचा संचालन कालावधी आता 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
ही विशेष रेल्वे मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, ढेहर का बालाजी, रिंगस, सीकर, लक्ष्मणगढ, फतेहपूर शेखावाटी, चूरू, रतनगढ, राजलदेसर आणि श्री डूंगरगढ या स्थानकांवर थांबणार आहे.
या विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये तसेच डब्यांच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES अॅप डाउनलोड करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच प्रवाशांनी या विशेष रेल्वेसेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.



