भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील साकरी गावामध्ये दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

सदर घटनेचा तीव्र निषेध करत दोषींवर भारतीय दंड संहिता कलम 302 तसेच पॉक्सो कायद्यान्वये कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष संदीप पंडित सुरखाडे व सरचिटणीस पवन बुंदेले यांनी केली आहे.
हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना तातडीने शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबांना शासनाकडून योग्य ती मदत देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी सौ रजनी सावकारे, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, संदीप सुरवाडे, गोलू पाटिल, यांचेसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.


