भुसावळ (प्रतिनिधी) –
हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन चौकात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रतिमा पूजन व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे /गौर, प्रा. उत्तम सुरवाडे, प्रा. दिलीप सुरवाडे, शिवसेना शहरप्रमुख मकबूल शेख, उज्वला बागुल, नगरसेवक सचिन पाटील, अकिल पिंजारी, सिकंदर भाई, योगेश बागुल, रमेश खरारे, नाना मोरे, निलेश चौधरी, अनुप खोब्रागडे , तसेच मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी गौरव केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना शहरप्रमुख गणेश चौधरी (सोनवणे) व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



