शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात प्रतिमा पूजन

भुसावळ ( प्रतिनिधी)-

हिंदूह्रदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला असून, बाजारपेठ पोलीस स्टेशनजवळ कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच संपूर्ण दिवसभर विविध सामाजभिमुख सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहे

या कार्यक्रमास भुसावळ शहरातील सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भुसावळ शहर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.