भुसावळ येथे भारतीय संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार’ वितरण सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी :
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भेदभावमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देणारा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा भुसावळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक तथा शैक्षणिक संस्था, भुसावळ यांच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ‘महाराष्ट्ररत्न राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार २०२५–२६’ प्रदान करण्यात येणार आहेत.

हा भव्य कार्यक्रम शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कृष्णचंद्र सभागृह, रेल्वे स्टेशनजवळ, भुसावळ येथे संपन्न होणार आहे. महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यास मा. ना. गुलाबरावजी पाटील (पाणीपुरवठा मंत्री तथा पालक मंत्री, जळगाव), मा. संतोषभाऊ चौधरी (माजी आमदार), अॅड. झाल्टे (प्रसिद्ध विधीतज्ज्ञ)) व डॉ. राजेशजी मानवतकर (एम.डी. स्पेशालिस्ट, समाजसेवक) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून ना. संजय शिरसाठ (सामाजिक न्याय मंत्री), जितेंद्र पाटील उपविभागीय जिल्हाधिकारी, केदार बारबोले (पोलीस उपअधीक्षक, भुसावळ), उध्दवजी ढमाळे (पोलीस निरीक्षक), डॉ. अर्चना सूर्यवंशी (संचालिका, नोबेल इंग्लिश मिडियम स्कूल), गायत्रीताई भंगाळे (लोकनियुक्त नगराध्यक्षा) यांच्यासह उल्हास पगारे नगरसेवक, सुमंगल तथा रविंद्र अहिरे अध्यक्ष : भारतीय बौध्द महासभा, जळगांव जिल्हा पूर्व . केदारजी बारबोले पोलीस उपअधिक्षक, उध्दवजी ढमाळे पोलीस निरीक्षक शहर पो.स्ट.डॉ. अर्चना सुर्यवंशी संचालिकाः नोबेल इंग्लिश मिडियम स्कुल, सौ. हर्षालीताई राजु पाटील मुख्याध्यापिका , मा. राहुलजी वाघ पोलीस निरीक्षक मा. श्री. रमेशजी मकासरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपाईमा. मनोज अत्माराम पाटील चेअरमन ग.स. सोसायटी, अध्यक्ष स्वामी समर्थ ग्रुपमा. सौ. काजल नरेंद्र मोरे नगरसेविका, मा. गणेशभाऊ सपकाळे जिल्हा अध्यक्ष भिमआमी मा. दामोदर राजपुत जिल्हा अध्यक्ष राजपुत करणी सेना अॅड. प्रिया अडकमोल निष्ठावंत महिला समाज सेविका भारती रंधे होमगार्ड अधिकारी, कंपनी कमांडर यांचेसह . बाळाभाऊ पवार युवा जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. विशाल सुर्यवंशी विफ एडिटर IBN न्युज महाराष्ट्रअॅड. जास्वंदी भंडारी समाजसेविका, विनोद सोनवणे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना,. दिनेश इरखारे जिल्हा अध्यक आवडल बाँस मिडिया शेख पत्रकार संघटना, वंदनाताई सोनवणे जिल्हा नेते. राजेश्रीताई सोनवणे समाजसेविका , उज्वला बागुल पत्रकार. समाधान निकम युवा नेता, निष्ठावंत समाजसेवकअंजुम खान शिक्षिका . सौ. संगिताताई भामरे निष्ठावंत नहिला समाज सेविका.वर्षाताई सुनिल लोखंडे जिल्हा अध्यक्षा नराट्रीय कामगार संघटना, मुंबई. जयश्रीताई रघुनाथ अहिरे राष्ट्रीय युवती अध्यक्षा पूया लांटी मोतीस मित्र, नाजित. वंदनाताई आराक जिल्हा अध्यक्ष: रिपब्लिकन सेना, जळगांवगुरुचंद्रमणी बुध्द विहार सर्व धम्म उपासिका यांचेसह प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाच्या निमंत्रक . सौ. संगिताताई भामरे असून संस्थेच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई इंगळे यांनी नागरिकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.