भुसावळ (प्रतिनिधी)
भुसावळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित सत्ताधारी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेचे विद्यमान दप्तर व प्रशासकीय कारभार संत गाडगेबाबा रुग्णालयात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने शहरात राजकीय वादळ उठले आहे. या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) गटनेते युवराज लोणारी यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र विरोध नोंदवला आहे.
नगरपरिषदेच्या स्थलांतरासाठी कोणताही अधिकृत ठराव, निविदा प्रक्रिया अथवा आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचा आरोप लोणारी यांनी केला. या स्थलांतरामुळे शहरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित नगरसेवक संतोष चौधरी यांनी विद्यमान नगरपरिषद इमारतीला “कोंडवाडा” असे संबोधले होते. याच पार्श्वभूमीवर लोणारी यांनी सत्ताधाऱ्यांना प्रतिप्रश्न उपस्थित करत म्हटले, “जर ही इमारत कोंडवाडा असेल, तर सत्ताधारी त्याच ठिकाणी गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी दाखल करणार आहेत का? नगरपरिषदेचे दप्तर रुग्णालयात हलवण्याच्या नावाखाली जनतेच्या आरोग्य सेवेशी खेळ केला जात आहे.”
संत गाडगेबाबा रुग्णालयात सध्या भूलतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने महिलांच्या प्रसूतीसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देता येत नसल्याकडेही लोणारी यांनी लक्ष वेधले. शहरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी काही वर्षांपूर्वी गरूड परिवाराने नगरपालिका दवाखान्यासाठी जागा दान केली होती, याची आठवण करून देत त्यांनी नगराध्यक्ष व सत्ताधाऱ्यांची जबाबदारी अधोरेखित केली. “भूलतज्ज्ञ व आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे ही सत्ताधाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.

मात्र चुकीच्या कामाला विरोध करणार असे यावेळी नगरसे1 के झालेल्या पत्रकार परिषदेला भाजपा गटनेते युवराज लोणारी , उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे, जिल्हासर चिटणीस व उपगगटनेते परिक्षीत बर्हाटे, नगरसेवक निर्मल कोठारी, गिरीष महाजन, राजेंद्र आवटे, नितीन धांडे, प्रकाश बत्रा , विशाल नाटकर, आशिक पटेल, पुरुषोत्तम नारखेडे, गुणवंत बोरोले, कैलास चौधरी , उदय पाटील , अल्बर्ट तायडे, सुनील भोळे, किरण कोलते, देवा वाणी, आदि उपस्थित होते, या प्रकरणात जिल्हाधिकान्याही भूमिका काव असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


