भुसावळात महिलांच्या कलागुणांना वाव देणारा हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न : जय संताजी महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी) — जय संताजी महिला मंडळ, भुसावळ यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक सणाचे औचित्य साधत महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या सस्नेह हळदी-कुंकू समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     कार्यक्रमाची सुरुवात समाजातील ज्येष्ठ महिला शोभा तेली, उषा पैठणकर, सुनंदा पाटील, रेखा गंथडे, संध्या चौधरी, मंगला चौधरी, मालती चौधरी, वत्सला चौधरी, लता चौधरी व मीनल चौधरी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुख्माई मूर्ती पूजन व तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाच्या अध्यक्षा सौ. कविता चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.                        अध्यक्षीय भाषणात सौ. कविता चौधरी यांनी समाजातील महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच ज्येष्ठ महिला, युवती, विद्यार्थिनी व गरजूंसाठी भविष्यातही जय संताजी महिला मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.            

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण …. विविध मनोरंजनात्मक खेळ व बक्षिसांची लयलूट ठरले. महिलांसाठी व मुलींसाठी संगीत खुर्ची, समूहगीत गायन, नृत्य स्पर्धा तसेच अन्य खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत खुर्ची स्पर्धेत उज्वला निळकंठ चौधरी यांनी प्रथम, सोनाली राठोर यांनी द्वितीय तर कामिनी चौधरी , किर्ती विलास चौधरी , प्रियंका चौधरी यांनीही क्रमांक पटकावला. नृत्य स्पर्धेत रागिणी चौधरी, शालिनी चौधरी, कामिनी चौधरी यांच्यासह निधी व श्रद्धा चौधरी यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

मीनल चौधरी यांच्या मधुर गीतगायनाने तसेच वत्सला चौधरी व लता चौधरी यांच्या भजनाने कार्यक्रमात भक्तिरसाची रंगत वाढली. सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. उपस्थित महिलांनी या सांस्कृतिक मेजवानीचा मनमुराद आनंद घेत परंपरेचा सन्मान राखत स्नेह व उत्साहाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे सौ. सुनीता पाटील व सूत्रसंचालन सौ. रेखा धुपे यांनी केले तर प्रास्ताविक सौ. वैशाली चौधरी मनोगत प्रतिभा चौधरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा सौ. कविता चौधरी, उपाध्यक्षा सौ. रेखा योगेश धुपे, सचिव उज्वला बागुल, सहसचिव सौ. प्रतिभा योगेंद्र चौधरी, कोषाध्यक्ष सौ. भारती संजय चौधरी यांच्यासह सौ. वैशाली चौधरी, सौ. सुरेखा चौधरी, सौ. सुनीता पाटील, सौ. दिपाली चौधरी, सौ. शितल चौधरी, सौ. रंजना चौधरी, सौ. पुष्पा चौधरी, सौ. उज्वला चौधरी, सौ. प्रियंका चौधरी, सौ. ज्योती चौधरी, सौ. सविता चौधरी, सौ. गायत्री चौधरी तसेच सल्लागार डॉ. सौ. वृषाली चौधरी व सर्व कार्यकारिणी सदस्यांसह शहर तेली समाज अध्यक्ष व. कार्यकारिणीसदय .यांनी विशेष परिश्रम घेतले.

मंडळाच्या सदस्यांनी सादर केलेल्या ‘तीळगुळ घ्या, गोड गोड बोला’ या नृत्यप्रकाराने कार्यक्रमास विशेष बहार आणली.

उपस्थित सर्व महिलांना हळदी-कुंकू, तीळगुळ व संक्रांतीची भेट (वाण) देण्यात आली. हा कार्यक्रम महिलांसाठी आनंदोत्सव ठरून सामाजिक एकोपा व सांस्कृतिक परंपरा जपणारा उपक्रम ठरला.