मध्य रेल्वेकडून भुसावळ–मिरज व अमरावती–पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या :


भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ–मिरज आणि अमरावती–पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी दोन फेऱ्या होणार आहेत.

भुसावळ–मिरज अनारक्षित विशेष गाडी (२ फेऱ्या)
गाडी क्रमांक 01209 ही विशेष गाडी 23 जानेवारी 2026 रोजी भुसावळ येथून सायंकाळी 4.50 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी 8.50 वाजता मिरज येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01210 ही 26 जानेवारी 2026 रोजी मिरज येथून सायंकाळी 7.00 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

या गाडीचे थांबे जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी व सांगली येथे असतील.
गाडीची संरचना 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी राहील.

अमरावती–पनवेल अनारक्षित विशेष गाडी (२ फेऱ्या)
गाडी क्रमांक 01416 ही 22 जानेवारी 2026 रोजी अमरावती येथून दुपारी 12.00 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे 4.00 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
परतीच्या मार्गावर गाडी क्रमांक 01415 ही 26 जानेवारी 2026 रोजी पनवेल येथून सायंकाळी 7.50 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 12.00 वाजता अमरावती येथे पोहोचेल.

या गाडीचे थांबे बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा व कर्जत येथे असतील.
या गाडीचीही संरचना 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.