भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील मध्य रेल्वेच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात नाहाटा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली. फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी व बॉक्सिंग या विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाने अनेक पदके पटकावली.

१९ वर्षे वयोगटातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत एकूण आठ संघांमधून नाहाटा महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या चार संघांमधून महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला, तर मुलांच्या सहा संघांमधून महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. कबड्डी स्पर्धेतही मुली व मुलांचे महाविद्यालयीन संघ उपविजेते राहिले.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णु चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा, प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. वाय. एम. पाटील, डॉ. जी. आर. वाणी, डॉ. डी. एन. पाटील, पर्यवेक्षिका प्रा. स्वाती पाटील तसेच क्रीडा शिक्षक प्रा. मनोज वारके यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो कॅप्शन- खासदार चषक स्पर्धेत विजयी स्पर्धकांसोबत ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ मोहन फालक सोबत डावीकडून प्रा मनोज वारके उपप्राचार्य प्रा वाय एम पाटील सेक्रेटरी विष्णू चौधरी चेअरमन महेश फालक कोषाध्यक्ष संजय नाहाटा प्राचार्य डॉ बी एच बऱ्हाटे पर्यवेक्षिका स्वाती पाटील


