भुसावळ ( प्रतिनिधी ) – माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची दि. २९ मे २०२४ रोजी हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी गोलू ऊर्फ धरमसिंग रायसिंग पंडित (वय ३०) याला अटक केली आहे.

आरोपी गोलू ऊर्फ धरमसिंग पंडित भुसावळात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांना मिळाली. त्यांनी वाल्मीक नगर परिसरात सापळा रचत आरोपी पंडित याला ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे घटनेच्या रात्री राखुंडे आणि बारसे यांना जळगावहून भुसावळकडे कारने येत असताना मरिमाता मंदिरासमोरील पुलाजवळ हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत पोलिस निरीक्षक डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पालवे, राहुल बेहेनवाल, कुणाल सोनावणे, भूषण चौधरी, दीपक शेवरे, विकार शेख आणि गनी मिर्झा यांनी सहभाग घेतला


