वरणगाव ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने फेस शिल्डचे वितरण ;

वरणगाव (प्रतिनिधी )- राज्यातील कोरोना आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुद्धा याची लागन होत असल्याचे लक्षात आल्याने राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार यांच्या संकल्पनेतून शासकिय डॉक्टराच्या व कर्मचाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने फेस शिल्डचे वितरण करण्यात येत आहे .याअन्तर्गत गुरुवार रोजी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात सुद्धा वितरण करण्यात आले
कोरोना या जिवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या वतीने सर्व शासकिय यंत्रणा अहोरात्र राबत आहे, नागरिकांसाठी संचार बंदी , व मास्क लावणे , सेनिटायझेशन करणे ,यासह सुरक्षीत अंतर ठेवण्याचे आदेश देऊन कोरोना या आजारावर मात करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे , कोरोना आजाराचे रुग्णाची तपासणी करताना राज्यातील काही डॉक्टराना याची लागन झाल्याचे राष्ट्रवादी कौग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यानी दखल घेत राज्यातील सर्व शासकिय रुग्णालयातील कोवीड १९ मधील कक्षात रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रवादी वेलफेअर संस्थेचे कोषाध्यक्ष आ.हेमंत टकले, व डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सर्वच शासकिय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्याना फेस शिल्ड चे वितरण करताना वरणगाव ग्रामीण रुग्णालयातही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविद्र भैया पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी ,विष्णु खोले, रविद्र सोनवणे , गणेश चौधरी ,समाधान चौधरी यांच्या प्रमुख उपस्थीतीत वितरण करण्यात आले .
यावेळी तालुकाअध्यक्ष दिपक मराठे सतोंष माळी , प्रकाश नारखेडे , प्रशांत मोरे आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *