भुसावळ (प्रतिनिधी ) – आगामी पालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणूक इच्छुक उमेदवारांनी कार्यलयातून अर्ज घेऊन तो भरून तेथेच त्वरित जमा करायचा आहे.अर्ज स्वीकारण्याची तारीख ६ ते ७ नोव्हेंबर २०२५ आहे.अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण संतोष भाऊ चौधरी जनसंपर्क कार्यालय,जय सियाराम कॉम्प्लेक्स,शनी मंदिर वार्ड असे आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ७० टक्के तरुणांना संधी देणार आहे.

अर्ज सादर केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखाती आमदार संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ता.८ व ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११;०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत संतोष भाऊ चौधरी जनसंपर्क कार्यालयात होतील.सर्व इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे तालुकाध्यक्ष विशाल नारखेडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले



