नवनियुक्त शिक्षकांना प्रशिक्षणाइतकी पर्यायी रजा मिळावी! … प्र. ह.दलाल.


भुसावळ (प्रतिनिधी ) –
राज्यातील नवनियुक्त शिक्षकां साठी दिवाळीच्या सुटीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे .दिवाळीची सुटी ही शिक्षकांची हक्काची सुटी असून ह्या सुटीत काही धार्मिक कार्यक्रम असतात.शिवाय अनेक शिक्षक गावी जाण्याचे नियोजनही करतात.नेमक्या ह्याच काळात त्यांचे साठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचे खर तर योग्यच नाही .त्यामुळे शिक्षकांचे सुटीतील नियोजनच बिघडले असून त्यांचा आनंद हिरावून घेतला गेलाय.आता ह्या शिक्षकांना प्रशिक्षण इतक्या दिवसांची पर्यायी रजा महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती) नियमावली,नियम क्रमांक १६(१८)( अ) नुसार पर्यायी रजा मंजूर करावी अशी मागणी जेष्ठ शिक्षक नेते प्र. ह.दलाल यांनी वरिष्ठांकडे केली आहे.