भुसावळात धूम स्टाईल व्यापार्‍याची 25 लाखांची रोकड लूटली -तिघांनी दुचाकीला धक्का देत लांबवली रोकडची पिशवी : सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध सुरू

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील एका बड्या व्यापार्‍याची रोकड घेवून कर्मचारी घराकडे निघाल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दुचाकीला धक्का दिल्यानंतर दुचाकीसह त्यावरील चालक खाली पडताच आरोपींनी दुचाकीस्वाराकडील 25 लाख 42 हजारांची रोकड लांबवल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 28 रोजी रात्री 10.20 वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील एका बडा व्यापार्‍याकडे मोहम्मद यासीन मोहम्मद ईस्माईल, (39, रा.सत्यसाई नगर, खडका रोड, भुसावळ) हे कामाला आहेत. सायंकाळी उशिरानंतर आलेल्या व्यवहाराची कॅश दुसर्‍या दिवशी बँकेत जमा करायची असल्याने त्यांनी कॅश एका पिशवीत टाकत घराकडचा रस्ता धरला. यावेळी सत्यसाई नगराजवळील कॉम्प्लेक्सजवळ रस्त्यावर दबा धरून बसलेल्या तिघांनी कर्मचार्‍याचा नित्यक्रम जाणून घेत त्याच्या दुचाकी (एम.एच.19 बी.सी.5586) ला धक्का दिला व त्यामुळे कर्मचारी मोहम्मद हा खाली पडताच रोकड असलेली पिशवी

पोलिसांची रात्री धाव
कर्मचार्‍याने याबाबतची माहिती आपल्या मालकासह पोलिसांना दिल्यानंतर पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, तालुक्याचे निरीक्षक महेश गायकवाड व कर्मचार्‍यांनी धाव घेत पाहणी केली.

सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयीतांच्या मिळालेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. शहरात घडलेल्या या घटनेनंतर व्यापारीवर्गात मोठी खळबळ उडाली आहे.