भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात खरे लढवैय्या म्हणून डॉक्टर्स,नर्सेस, प्रशासन,पोलीस व सफाई कामगार लढा देत आहे . त्यांच्या कार्याला सलाम करून आपण सुद्धा यांच्या साठी थोडे कर्तव्य व जबाबदारी म्हणून काहीतरी करावे हा उद्देश समोर ठेवून भुसावळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सईदा शेख शफी,मा.उपनगराध्यक्ष हाजी शेख शफी शेख अजीज या दांपत्यानी एक हात मदतीचा म्हणून येथील आरोग्य विभागातील अधिकारी व सफाई कामगार बांधवांना भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार केला .
स्थानिक जाम मोहल्ला भागातील निवासस्थानासमोर सोशल डिस्टन्स ठेवून मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवार २८ रोजी सत्कार करण्यात आला.यावेळी प्रभारी आरोग्याधिकारी निवृत्ती पाटील,वसीम शेख,मुक्तार शेख आदी उपस्थित होते.



