छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डीआरएम कार्यालयात .
रेल कामगार सेना केंद्रीय अध्यक्ष, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत,सरचिटणीस दिवाकर देव, केंद्रीय कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या आदेशाने रेल कामगार सेना भुसावळ मंडळ तर्फे महाप्रबंधक मध्य रेल्वे विजयकुमार यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा,भगवी शाल व,गुलदस्ता देऊन सत्कार केला .यावेळी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.यावेळेस रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा,मंडल कार्याध्यक्ष प्रीतम टाक,मंडळ संयुक्त सचिव विनोद वाघे,मंडळ उपाध्यक्ष अरविंद थोरात,मीडिया प्रभारी मुकेश महाजन व इतर पदाधिकारी हजर होते. महाप्रबंधकांबरोबर कामगारांच्या ज्वलंत व प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.जीएम यांनी सर्व ज्वलंत प्रश्न मुद्दे ऐकून लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.

प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डीआरएम ऑफिसच्या प्रवेशद्वारा जवळ बसवणे,रेल्वे कामगारांसाठी अतिरिक्त रीजर्वेशन खिडकी डीआरएम कार्यालयात चालू करणे,नवीन पेन्शन स्कीम बंद करून जुनी पेन्शन स्कीम चालू करणे,एमओएच हे वर्कशॉप आहे की रनिंग शेड हे घोषित करणे,अपडाऊन करणाऱ्या सर्व कामगारांना एफ आर सी कार्डपास देणे,रेल्वे दवाखान्यात ड्युटीवर हजर असणाऱ्या डॉक्टरांचा सूचना फलक मुख्य प्रवेश द्वाराजवळ लावणे,रेल्वे दवाखान्यात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांवर सकाळ,दुपार,संध्या काळ असे लेबल लावून औषध देने,10:40 व ऑन रिक्वेस्ट कामगारांना POH,TMW NKRD व इतर झोन मध्ये बिनाविलंभ लवकरात लवकर रिलीव्ह करणे,रेल्वेच्या सर्व विभागात कामगारांना शुद्ध पाणी पिण्यासाठी आरो प्लांट लावणे.
जर कामगारांच्या ज्वलंत व प्रलंबित मागण्या मंजूर नाही झाल्या तर लवकरच रेल कामगार सेने तर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल या बाबत चर्चा केली.
फोटो कॅप्शन – मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर विजयकुमार यांना सन्मानित करतांना रेल कामगार सेनेचे ललित कुमार मुथा व कार्यकर्ते.



