भुसावळ (प्रतिनिधी ) -, भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील नागमई शेती शिवारात अचानक गायीवर हल्ला केला त्यात गाय ठार झाली भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील नागमई शेती शिवारात
मारोती मधुकर पाटील यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला केला त्यात गाय ठार झाली. घटनास्थळी बिबट्याचे ठसेही आढळले आहेत. घटनास्थळाचा वनविभागाने पंचनामा केला आहे. वनपाल अनिल साळुंखे व वनकर्मी सुनील पाटील उपस्थित होते. या घटनेने शेतकरी आणि शेतमजूर वर्गात घबराट पसरली असून बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी व मजूर शेतात काम करण्यासाठी जाण्याची हिंमत करीत नसल्याने शेतीच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांनी सावधगिरीने वावरावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.



