भुसावळ (प्रतिनिधी) –
भुसावळ न्यायालयात १५ सप्टेंबर रोजी पक्षकारा स एन ओसी व फि च्या मुद्यावरून मारहाण झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार धनंजय पंडीत पाटील ‘ वय 30 धंदा इंजिनियर . रा जुना सातारा भुसावळ हे दिनांक 15/09/2025 रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ कोर्ट परिसरात कारण वकिल बदलविणे कामी NOC मागितली असता त्याचा सदर वकिला स राग आला होता .फिर्यादी यांची केस भुसावळ कोर्टात सुरु असुन ही केस भुसावळ कोर्टात विवेक आवारे चालवत असताना फिर्यादी यानी आरोपी याना वकील बदवलण्यासाठी NOCमागीतली असता आरोपी विवेक आवारे याने शिवीगाळ करुन धनंजय यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली हे फिर्यादीस बोलले कि तुला जे करायचे आहे ते कर सदरची घटना कोर्टात नेमणूक असलेल्या पोलीसा समोर घडली आहे .घटनेत फिर्यादी धनंजय यास वकील चेंबर मध्ये नेवुन ही मारहाण करण्यात आली असून सदर व्यक्तीस प्रचंड मनस्ताप झाला आहे . न्यायालयात घडलेल्या या प्रकारामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाली आहे .
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पनाका BNS 115 (2), 351(2),352 प्रमाणे तक्रार नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पो हे कॉ अमोल विसपुते करीत आहेत .



