भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र शासन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र दिपनगर येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी
स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आनंदी वातावरणात संपन्न झाला
ध्वजारोहन कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष देशपांडे अधिक्षक अभियंता भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांच्या हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे . राजेश पवार व्यवस्थापक वित्त लेखन विभाग भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर
विशेष उपस्थिती – अश्विनी देशपांडे , शिल्पनिदेशक शिक्षिका .श्शलेंद्र सपकाळे. सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटना पदाधिकारी .अनंत जाधव, स्वप्निल पाटील, संजय तायडे, मनोज मोरे. श्रीराम फड. नितीन सोनवणे , सचिन भावसार व शारदा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद महेंद्र सपकाळे.श्रीमती.मनिषा पाटील हे उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन .किशोरकुमार मनोहर पाटील केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र दीपनगर यांनी केले
कार्यक्रमाच्या वेळी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथील कामगार व कामगार कुटुंबीय बंधू, भगिनी व केंद्र सभासद तसेच शारदा माध्यमिक विद्यालय दीपनगर येथील विद्यार्थी तसेच बालविकास अंगणवाडी सेविका , उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामगार कल्याण केंद्र दिपनगर येथील कर्मचारी सौ.शारदा भावसार व ललित माळी यांनी परिश्रम घेतले




