वाशी एपीएमसीतील धान्य मार्केटच्या व्यापाऱ्याला कोरोनाची लागण.

नवी मुंबई (प्रतिनिधी )
वाशी तुर्भे येथील मुंबई एपीएमसीतील धान्य मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण  झाली आहे. व्यापाऱ्यााला कोरोना झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. तसेच बाजारातील व्यापारी, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्यामध्ये भीतीचे  वातावरण आहे. धान्य मार्केट मध्ये 300 ते 325 गाड्याची धान्य व डाळी चे आवक  होती.  मुंबईला कडधान्य पुरवठा होणाऱ्यासाठी बाजारात वाहतूकदार आले होते मात्र धान्यमार्केट मध्ये एका व्यपाऱ्याला कोरणाचे लागण झाल्याने वाहतूकदार, माथाडी कामगार व व्यपारी 80 टक्के बाजारातून निघून गेले आहेत त्यामुळे मुंबईला कडधान्य पुरवठा मध्ये अडचण होऊ शकतो असे काही व्यापारी यांनी सांगितले,
नवी मुंबई महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले प्रमाणे मार्केट मधील व्यापारी सानपाडा पामबीच मध्ये राहत होता कोरोना पोजिटीव्ही आल्याने त्याला उपचारासाठी वाशी मनपा कोव्हीड 19 रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे ,त्याचं ट्रॅव्हल हिस्ट्री तपासणी करून त्यामध्ये कित्ती वेळा बाजारात गेला अजून कुठे गेले त्यावर आम्ही निर्णय घेणार असल्याचे सांगितले
देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी बंद असलेले एपीएमसी मार्केट सुरु करण्यात आले होते. मार्केट सुरु झाल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गर्दी निर्माण झाली होती. बाजारातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे समितीने वारंवार आवाहन करूनही नागरिक दक्षता घेत नसल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण होते.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर मार्केटच्या गेटवर जाहीर सूचनेचा फलक लावण्यात आला होता. या जाहीर सुचनेत व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार ,वाहतूकदार, माथाडी कामगार आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझर लाऊन आणि मास्क तोंडाला बांधून प्रवेश करावा. सदर सुचनेचे उल्लंघन केल्यास 1000 एवढा दंड आकारण्यात येईल आणि संबंधीतावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं ठळकपणे सूचनेत नमूद करण्यात आलं होते.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशात 170 जागेची हॉटस्पॉट  यादी जाहीर करण्यात आली असून नवी मुंबईचा समावेश आहे .नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 54 वर पोहोचली आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *