कोरोनामुळे लोक लॉकडाउनची परिस्थितीत फक्त तीघांच्या उपस्थितीत दिनांक १४ एप्रिल सकाळी दहा वाजता अल्फलाह इंग्लिश कॉन्व्हेंट मोताळा कार्यालयात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी श्रीमती अंजना खुपराव यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पगुच्छ अर्पण केले. तसेच हुसेन कुरेशी संस्थापक अध्यक्ष अल्फलाह इंग्लिश कॉन्व्हेंट मोताळा यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले यानंतर सुधाकर खूपराव सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनपटावर प्रकाशझोत टाकत उपस्थित दोघांना मार्गदर्शन केले व पुष्पगुच्छ अर्पण केले. आधार प्रदर्शन शाळेचे अध्यक्ष कुरेशी यांनी करून कार्यक्रम समाप्त केला.



