भुसावळात न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदा व्हि.सी.द्वारे जामिनावर सुनावणी ; पहिल्याच दिवशी मारूळ हाणामारी प्रकरणातील दोघा संशयीत आरोपींना मिळाला जामीन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून न्यायालयात देखील महत्वपूर्ण खटल्यांवरच कामकाज सुरू करण्यात आले आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अति महत्वाच्या खटल्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे खटला चालवण्याचे निर्देश असल्याने गुरुवारी अतिरीक्त जिल्हा न्या.भंसाली यांच्या न्यायालयात मारूळ, ता.यावल येथे दोन समाजात झालेल्या हाणामारी प्रकरणी युक्तीवाद होवून दोघा आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. भुसावळात न्यायालय स्थापन झाल्यानंतर प्रथमच व्हिडिओ कॉन्फ्रसिंगद्वारे कामकाज झाल्याने ही विशेष बाब ठरली आहे .
दोघा आरोपींना जामीन
मारूळ येथील घटनेप्रकरणी संशयीत आरोपी कारागृहात होते. या आरोपींच्या जामिनाबाबत व्हि.सी.द्वारे सुनावणी झाली. आरोपींतर्फे अ‍ॅड.मनीष सेवलानी यांनी व्हि.सी.द्वारे युक्तीवाद केला. त्यांना अ‍ॅड.जावेद मेमन यांनी सहकार्य केले तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या.भंसाली यांनी आरोपींना १५ हजारांच्या पीआर बॉण्डवर सोडण्याचे आदेश दिले. असलम व सुतार अशी जामीन मिळालेल्या संशयीत आरोपींची नावे असून त्यांना 5 मे पर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, अ‍ॅड.जगदीश कापडे यांनी देखील एका खटल्याप्रकरणी व्हि.सी.द्वारे बाजू मांडल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *