बामणोद (प्रतिनिधी ) – रक्तदान श्रेष्ठदान या संकल्पनेनुसार बामणोद नजिक सुनासावखेडा येथील कष्टभंजन हनुमान मंदिर, यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे

गुरुवार दिनांक 10/07/2025 रोजी सकाळी ठीक 10 वा.पासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कष्टभंजन हनुमान मंदिर,सूना सावखेडा,येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून या शिबिरात रावेर व भुसावळ तालुक्यातील ज्या बंधू भगिनींना रक्तदान करावयाचे असेल त्या रक्तदात्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे .


