21 जून स्वर्गीय बापूराव मांडे यांची 84 वी जयंती… यानिमित्त त्यांनी सुरू केलेल्या गोशाळा हरिपुरा येथे अनुदानित आश्रम शाळा मोहराळे चे विद्यार्थी,शिक्षक व सर्व गोशाळेचे कार्यकर्ते यांनी मिळून एकूण 84 झाडांची, वृक्षांची लागवड केली तसेच ही रोपे आणि वृक्ष सर्वांनी मिळून किमान वर्षभर काळजी करून वाढवण्याचा संकल्प केला.

कै.बापूराव मांडे यांचे वृक्षप्रेम तसेच पुढे जोपासण्याचा हा प्रयत्न केला असून . या मुळे आपल्या हरिपूरा प्रकल्पाच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल असा विश्वास यावेळी सोनूभाऊ मांडे यांनी व्यक्त केले .



