सांगवी बुद्रुक व बेळी येथे वारकरी भजन प्रशिक्षण शिबिरात नवविचारांची मांदीयाळी

न्हावी ता यावल वार्ताहर – सद्गगुरू झेंडूजी महाराज बेळीकर पायी दिंडी दिव्य परंपरा संचलित वारकरी भजन प्रशिक्षण शिबिर अंतर्गत उपस्थित सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांच्या विचारात परिवर्तन घडवण्याच्या उद्दिष्टाने अनेक विविध विषयांवर आधारित नवविचारांच्या व्याख्यानमालीकेचे आयोजन दिनांक ३ मे पासून दररोज दुपारी ४ ते ५ या वेळेत सांगवी बुद्रुक व श्री क्षेत्र कुंडलेश्वर बेळी येथे करण्यात आलेले आहे .त्यात प्रामुख्याने श्रीक्षेत्र कुंडलेश्वर बेळी तालुका जळगाव या ठिकाणी दिनांक ४ मे रोजी रवींद्र चौधरी पाचोरा यांचे चमत्कारामागील विज्ञान तसेच ६ मे रोजी ज्ञानेश्वर इंगळे यांच्या आनंदाने शिका आनंदाने शिकवा या विषयांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे . तसेच वारकरी भजन प्रशिक्षण शिबिर सांगवी बुद्रुक तालुका यावल या ठिकाणी ३ मे रोजी व पु होले सर यांचे संस्कृती आणि देश , ५ मे रोजी मिथुन ढिवरे यांचे अंधश्रद्धा निर्मूलन व प्रबोधन या विषयावर आधारित व्याख्याने होणार आहेत .दि. ७ मे रोजी शुभांगी सरोदे यांची संत ज्ञानेश्वर जीवन परिचय एकांकिका सादर करणार आहेत .दि. ८ मे रोजी आर आर बावस्कर संत रविदास जीवन व कार्य यांचा परिचय करून देणार आहेत .दि.९ मे रोजी जीवन महाजन यांचे धर्मनिष्ठा एक विचार या विषयावर विचार पुष्प गुंफणार आहेत . श्री क्षेत्र कुंडलेश्वर बेळी येथे दि.१२ मे रोजी शासकीय तंत्रनिकेतन जळगाव येथील प्रा. आर वाय पाटील हे आजची शिक्षण पद्धत व अध्यात्माची गरज या विषयावर आपले विचार मांडतील . तसेच दि. १३ मे रोजी ह भ प पंकज भंगाळे सर स्वातंत्र्यवीर सावरकर एक विचारधारा या विषयावर व्याख्यान देणार आहेत .तरी वरील सर्व कार्यक्रमास उपस्थिती द्यावी अशी आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे .