ओ महादेव का रुद्र है शंभु…..मुंडे यांनी काव्यरुपात उलगडली शंभु गाथा;


भुसावळ,( प्रतिनिधी दि. २९ ) : भस्म का जो शृंगार करे ओ महादेव का रुद्र है शंभु ….असे म्हणत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन परीचय ‘शंभुगाथा’ या कार्यक्रमात अभिजीत मुंडे (पुणे) काव्यरुपात करुन दिला. परशुराम जयंती निमित्त श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे बियाणी स्कुलच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योजक मनोज बियाणी, संगिता बियाणी, वेद ओझा, परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष भुषण जोशी व्यासपीठावर उपस्थित होते

. यावेळी अभिजित मुंडे म्हणाले काव्यातुन शंभुगाथा मांडण्याचा उद्देश म्हणजे महाराष्ट्र हा एक जीवंत कविता संग्रह आहे. येथे कविता लिहिली जात नाही तर जगली जाते. हिंदीतुन यासाठी की इतर लोकांनाही संभाजी महाराजांचे कर्तृत्व समजलले पाहिजे. मुंडे म्हणतात सईबाईच्या पोटी जन्माला आलेले संभाजी शुर, वीर होते. पण लहानपणा पासुनच अनेक धक्के सहन करावे लागले. समज येण्याच्या आधीच मातृछत्र गमावले गेले.‌ मोठेपणी देखील अनेक धक्के सहन करावे लागले पण ते डगमगले नाही. मुंडे पुढे म्हणतात भस्म का जो शृंगार करे ओ महादेव का रुद्र है शंभु |
पाच साल तक मुगल लडे| पर एक किला न जित सके | मुघलांचे तळवे चाटणाऱ्यांमुळे संभाजी महाराज पकडल्या गेले. तेव्हा सगळ्यांना शंभर टक्के वाटत होते की औरंगजेबा समोर गुडघे टेकेल, मुकूट फेकुन देऊन मान खाली घालेल. पर गर्दन नही झुकने वाली | बात की भाती लडनेवाला है | जब तक धडकन न रुकने है |

भुषण जोशी यांनी प्रास्ताविक केले तर अनिरुद्ध कुळकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. गिरीश कुलकर्णी सर यांनी केले कार्यक्रमाला विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे, उद्योजक पिंटु कोठारी, राजेंद्र आवटे, भाजपचे शहर प्रमुख किरण कोलते आदी उपस्थित होते.