भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील खडका रोड भागातील गडकरी नगर,करूनेश्वर महादेव मंदिर जवळील इसमाने रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्ती पोलीस ( जी.आर.पी) कर्मचाऱ्यांच्या मुलांची नऊ लाख ६४ हजार रुपयात फसवणूक केले प्रकरणी संशयित आरोपी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल यांचे विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून मा.न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी मुरलीधर सोसायटी घर नं .१६ जुना तोल काटा,टाटा मोटर्स मागे फेकरी येथील रहिवासी लोहमार्ग पोलीस सेवानिवृत्ती कर्मचारी वसंत जानबाजी ढोणे यांचे मुलांला रेल्वेत हेड क्लार्क नोकरी लावून देण्यासाठी नऊ लाख ६४ हजार साठ रुपये संशयित आरोपी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल याने जामनेर रोडवरील बालाजी कॉम्प्युटर ग्राहक सेवा,बियाणी चेंबर्स खोटे कागदपत्र बनवून देवून डी.डी.व्दारे वेळोवेळी घेवून फसवणूक केली.तसेच इतर लोकांकडून पैसे घेतल्याचे समजले आहे.वसंत जानबाजी ढोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.सदरील संशयित आरोपीस मा.न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.


