न्हावी जिल्हा परिषद शाळेतील 38 वर्षीय शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू –

यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी तथा न्हावी गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील 38 वर्षीय शिक्षकाचा सोमवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. मृत शिक्षक हे हल्ली फैजपूर शहरात निवासाला होता. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेले असता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याच्या मृत्यू झाला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जुम्मा नशीर तडवी (38) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
तडवी हे उर्दू शाळेतील शिक्षक न्हावी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते व हल्ली फैजपूर शहरात निवासाला होते. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत शिक्षकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मृत शिक्षकावर किनगाव या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.