चोपडा – तालुक्यातील ग्रामपंचायत अडावद येथील लोकनियुक्त सरपंच तसेच संबंधित ग्राम विकास अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू असून हे दोघेजण ग्रामपंचायत सदस्यI तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना कोणत्याही विश्वासात न घेता परस्पर कामे करीत आहे कोणत्याही प्रकारचे कामांची बिल मासिक मीटिंगमध्ये न चर्चा करता परस्पर ऑनलाईन दिले जात आहे.

याबाबत सदस्यांनी विचारणा केली असता ग्रामपंचायत सदस्या ग्रामपंचायत सदस्य यांना उडवा उडवी चे उत्तरे देतात तसेच मासिक भत्ता दिनांक 24 – 2025 च्या मिटींगला कामांची बिल अदा न करण्याचे ग्रामपंचायत सदस्या तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले असता ते बिलाची रक्कम त्यांनी अदा करून दिलेली आहे आणि गावामध्ये काँक्रीटीकरण रोड व फेवर ब्लॉक तसेच गटारीचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत.
त्या निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामाचे बिल अदा करू नये असे ग्रामपंचायत सदस्यI व ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले असता तरीसुद्धा ते बिल त्यांनी परस्पर ऑनलाईन द्वारे अदा करून दिलेले आहेत त्या कामाची गटविकास अधिकारी चोपडा तसेच पंचायत समिती चोपडा यांनी याबाबत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अडावद तालुका चोपडा येथील ग्रामपंचायत सदस्या तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे.या आशयाचे निवेदन येथील ग्रामपंचायत सदस्या तसेच ग्रामपंचायत सदस्य
रवींद्र लक्ष्मण चव्हाण संदीप कैलास महाजन कमलाबाई राजू खजुरे रेखाबाई मंगेशराव पारधी जुनेद खान मुनसफ खान पठाण शाहरुख हैदर तडवी बानोबी शेख रशीद मणियार शकीला बी मुनसफर पठाण तुषार रवींद्र देशमुख मोसिन अलीयार खा तडवी पंकज महाजन यांच्यासह अडावद ग्रामपंचायत मध्ये 16 सदस्य आहे त्यापैकी 11 ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदन दिलेले आहे.
या सदस्यांनी सर्व निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी चोपडा तसेच पंचायत समिती चोपडा यांच्याकडे निवेदन दिलेले आहे


