भुसावळ:-(प्रतिनिधी ) – भारतीय बौद्ध महासभा संरक्षण विभाग समता सैनिक दल जळगाव बटालियन तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचा 98 वा वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णंंकुरुती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन देण्यात आली यावेळी स सै दल अधिकारी, सैनिक व भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य महीला विभागा मोठ्या संख्येने उपस्थितीत वर्धापन दिनाचं आयोजन संपन्न झाले,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशात समता स्थापन करण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापन केली होती. त्यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या महिला अध्यक्षा प्रियंका अहिरे व जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार यांच्या उपस्थितीत समता सैनिक दलाचा वर्धापन दीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून वंदन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले. प्रमुख उपस्थितीत मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष मेजर रमेश साळवे, ए. टी. सुरडकर, श्रावण साळुंके, राजेंद्र अडकमोल, आनंद निकम, संध्या सावंत, वनिता साळवे, करुणा नरवाडे, प्रतिभा सोनवणे, इत्यादी होते.
तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मेजर रमेश साळवे यांनी केले.




