जळगाव (प्रतिनिधी ) – पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा पाळधी खुर्द येथे आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी विद्यार्थिनींसाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

आरोग्य तपासणीसाठी डॉ प्राची गौरव महाजन एम डी बालरोग तज्ञ व डॉ शाहिद यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून आरोग्य तपासणी केली. या शिबिरात एकूण 276 विद्यार्थिनिंची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी गावाचे सरपंच लक्ष्मीबाई व शरद कोळी तसेच उपसरपंच दिलीप बापू पाटील, ग्रामपंचायत सदस्य चंदू भाऊ माळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष एकनाथ पाटील, सदस्य मंगलाताई बाविस्कर, डॉ शाहिद ,केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे सर तसेच नारी शक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ मनीषा पाटील मुख्याध्यापिका सौ संगीता असोदेकर, तसेच देवेंद्र राजेंद्र सोनार, गुलाम अली यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक उषा निकम प्रदीप बोरसे अनिता कोचुरे सत्यवान जाधव वैशाली जाधव भावना कोळी दिनकर पाटील या शिक्षकांचे सहकार्य लाभले
प्रसंगी केंद्रप्रमुख प्रमुख सोनवणे व सौ माधुरी शिंपी यांनी आरोग्य विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी नूतन तासखेडकर, किमया पाटील, शिल्पा बयास, हर्षा गुजराती, मरियम बुगडवाला, आशा मौर्य इत्यादींनी आरोग्य शिबिरास सहकार्य केले यावेळी ज्या विद्यार्थिनींचे आरोग्याविषयी समस्या होत्या त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली. आरोग्य तपासणी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका ज्योती राणे व आभार वैशाली जाधव यांनी मानले.


