भुसावळ (प्रतिनिधी ) – महिला क्रीडा मंडळ तर्फे महिला दिना साठी एक आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आले नववधू मेकअप स्पर्धा या स्पर्धेसाठी भुसावळ मधील 40 ब्युटी पार्लर च्या संचालिका व 40 मॉडेल सामील झाले होते ब्राह्मण संघ येथे दुपारी तीन वाजता हि स्पर्धा सुरू झाली. अतिशय उत्साहात या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेनंतर लगेचच सहभागी स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते बक्षीस देण्यात आली . परीक्षकांनी अतिशय उत्तमरीत्या परीक्षण करून निकाल काढले
बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वर्षा कोळंबे उपस्थित होते

या प्रसंगी आगाव वेगळा कार्यक्रम घेऊन महिला दिन साजरा करण्यात आला . यात म्हशी चारणाऱ्या व शेती काम करणाऱ्या इंदुबाई कोळी या गरीब निराधार महिलेचा महिलादिनानिमित्त प्रतिकात्मक सत्कार करून त्यांना साडी, चादर उपयोगी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले .
अध्यक्ष आरती चौधरी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला, त्यात त्यांनी सांगितले की , बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्य व आत्मविश्वास असलेली प्रत्येक महिला ही सुंदरच असते , अर्थात महिला या मुळात सृजनशील असतात त्यांना कमीत कमी साहित्यातून चांगलं कसं करता येईल हे ज्ञान उपजतच असतं आणि म्हणूनच आयोजित या मेकअप स्पर्धेतून पण हेच साध्य करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली , आत्मविश्वास असलेली प्रत्येक महिला सुंदरच दिसते असे प्रास्तावीकात सांगितले.
सचिव लता होसकोटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
स्पर्धकांनी प्रतिक्रियेत सांगितले की सगळ्यांनी स्पर्धा खूप एन्जॉय केली. अशी स्पर्धा प्रथमच भुसावळमध्ये झालेली आहे.
या प्रसंगी, भुसावळ मधील नेत्र रोग तज्ञ डॉ. वर्षा कोळंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांची ओळख किरण चौधरी यांनी केली,या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून ब्यूटीशियन माया पवार उपस्थित होत्या. त्यांची ओळख प्रोजेक्ट चारु महाजन यांनी केली.
स्पर्धेतील विजेते. या प्रमाणे – 1) प्रथम.. रश्मी पाटील, द्वितीय.. काजल भंगाळे, तृतीय.. कावेरी जाधव, बेस्ट आय मेकअप.. छाया पाटील , बेस्ट काँस्च्यूम.. प्रेरणा खडसे बेस्ट ज्वेलरी… प्रिया कोळी
हेअरस्टाईल.. चैताली पाटील , नॅचरल मेकअप… वर्षां निकम,
ट्रेडीशनल लूक.. पुनम कोळी पर्सनॅलिटी.. प्रिया तायडे यांनी बक्षिसे पटकावली .
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपाध्यक्ष स्वाती नाईक यांनी अतिशय सुंदर शब्दात केले.
आभार प्रदर्शन विनीता नेवे यांनी केले. याप्रसंगी महिला क्रीडा मंडळाचे सचिव लता होसकोटे, स्वाती नाईक, किरण चौधरी, चारू महाजन, प्रिता पिंगळे, विनीता नेवे, माधुरी गव्हाळे, अनिता सपकाळे, अनिता कवडीवाले, भारती चव्हाण, प्रभाताई पाटील, रश्मी ठोसर सुनीता पाचपांडे मंगला पाटील, संगीता पाटील, वैशाली पाटील उपस्थित होते.


