शिरपूर – शिर्डीहून इंदुरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स (एम.पी.09 पी.ए.0271) भरधाव वेगाने निघाल्यानंतर दभाशी गावाजवळ ती अनियंत्रित होऊन उलटली.

हा अपघात मंगळवारी पहाटे तीन वाजता झाला. या अपघातात नंदूबाई तुळशिराम गुंड (52, रा.ठाणगाव पिंपरी, ता.येवला, जि.नाशिक) या ठार झाल्या. या अपघातात महिलेचे डोके व हात शरीरापासून वेगळे झाले. इतर 14 जण किरकोळ जखमी झाले. त्यापैकी सात जणांवर हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


