पुण्यात ब्रँडेडतरुणीवर शिवशाहीत बलात्कार ; सराईत गुन्हेगाराचे नाव आले समोर : आरोपी फरार

पस्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पुण्याहून फलटणला जाणाऱ्या महिलेवर पहाटे साडेपाच वाजता बलात्कार केला. स्वारगेट एसटी स्टँडमध्ये अभ्या असलेल्या बसमध्ये बलात्कार केला, तरूणीच्या तक्रारीनंतर पोलिसाकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवशाहीमध्ये बसमध्ये तरूणीवर बलात्कार कऱणाऱ्या आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असल्याचे समोर आलेय.

शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव दत्तात्रय गाडे आहे. दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहेत. दत्ता गाडे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. धमकी देणं, चेन स्नॅचींग यासारखे गुन्हे दत्ता गाडे याच्यावर आहेत.

दत्तात्रय गाडे हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे. गाडे याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गाडे हा मूळचा शिरूरचा आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून दत्ता गाडे याचा शोध घेतला जात आहे. तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे फरार झाला आहे.

स्वारगेट बस स्थानकात आणि परिसरामध्ये नेहमीच गर्दी असते. रहदरीच्या ठिकाणी शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. दत्ता गाडे या सराईत गुन्हेगाराने तरूणीला बातावणी करत पहाटे बसमध्ये जाण्यास सांगितले, त्यानंतर तिथेच तिच्यावर अतिप्रसंग केल. रहदारी असणाऱ्या परिसरात तरूणीवर एसटी बस स्थानकामध्ये बलात्कारासारखे कृत्य केल्यानं महिला सुरक्षित आहेत का? असा सवास उपस्थित झाला आहे

२६ वर्षीय तरूणी फलटणला घरी जाण्यासाठी पहाटे स्वारगेटच्या बस स्थानकात आली होती. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दत्ता गाडे याने तिला तुझी बस दुसरीकडे उभी असल्याचे सांगितले. माझी एसटी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही, असं त्या मुलीने सांगितले. एकट्या मुलीचा फायदा घेत गाडे याने तरुणाने खडसावले. अंधारात बस स्थानकात उभ्या असणाऱ्या शिवशाहीत तिला जायला सांगितले, ही बस फलटणाला जाणार असल्याचे सांगितले. तू टॉर्च लावून, आतमध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला.

पुण्यात मदतीला कुणीही नाही..

ही घटना घडल्यानंतर पुण्यात त्या तरूणीची कोणतीही मदत केली नाही. ही तरूणी दुसऱ्या बसने फलटणला आपल्या घरी पोहचली, त्यानंतर आपल्यासोबत घडलेला प्रसंग तिने सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. दत्तात्रय रामदास गाडे असं आरोपीचं नाव आहे. आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद आहे.