भुसावळ – स्वच्छता अभियानाचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती परीट समाजाचे आराध्य दैवत संत परंपरेतील शेवटचे संत गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .

यानिमित्त पर्यावरण मित्र डॉ.सुरेंद्रसिंग पाटील यांनी महाराष्ट्र सरकारने गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू आहे त्याच अनुषंगाने त्यांच्या जयंती पासून स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करावे असे सांगून गाडगेबाबा तुकाराम महाराजांना गुरु मानत तसेच मी कोणाचा गुरु नाही व माझे कोणीही शिष्य नाही त्यांनी कीर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य केले अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता या विरोधात जनजागृती करण्याचे काम केले जनतेकडून आलेल्या देनग्यांमधून त्यांनी ठीक ठिकाणी धर्मशाळा अनाथालय आश्रम दिन दुबळे अपंग अनाथ हेच आपले देव मानले लोकसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे ते आपल्या कीर्तनात कायम सांगत कर्ज काढून देवाची यात्रा करू नका तसेच मुलांना मुलींना शाळेत शिकवल्या विना राहू नका बाबांनी बिघडलेल्या माणसांना सुधारण्याचे मोलाचे कार्य केले अनेक दोष असलेल्या माणसांना सद्गुनी बनवण्याचे कार्य मोठ्या कौशल्याने केले समाजातील निरक्षरता अज्ञान अन आरोग्य अंधश्रद्धा अस्पृश्यता असमानता व्यसनाधीनता दूर करण्याचे महान कार्य केले तसेच अनेक धर्मशाळा पाणपोई शाळा महाविद्यालय गोरक्षण शाळा जनतेकडून बांधून घेतल्या परंतु त्याचा उपयोग स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी समाजातील लोकांसाठी केला नाही किंवा त्यांनी स्वतः त्याचा उपभोग घेतला नाही अश्या महान संतांचे विचार सर्वाना कळावे तसेच समाजप्रबोधन करीता सर्व शासकीय ,निमशासकीय ऑफिसेस , नगरपालिका ग्रामपंचायत त्यांच्यामार्फत आपले गाव,तसेच सर्व शाळा, महाविद्यालय मंदिर ,खाजगी संस्था, कार्यालय आजूबाजूचा सर्व परिसर व इतर सर्व ठिकाणी स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करून आपल्या सर्वांच्या सहभागातून सर्व परिसर स्वच्छ करून शासनाच्या स्वच्छ शहर , स्वच्छ गाव, स्वच्छ वार्ड ठेवण्यास मदत करूया. असे आवाहन सुरेंद्रसिंग यांनी केले . महाराष्ट्र सरकारने गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू आहे त्याच अनुषंगाने त्यांच्या जयंती पासून स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करावे
गाडगे बाबांचे नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर होते. ते स्वतः एक खराटा जवळ बाळगायचे डोक्यावर विस्कटलेले केस त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवळी दुसऱ्या कानात कुट्या बांगडीची काच अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे त्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. गाडगेबाबा ज्या गावात जात ते गाव झाडून स्वच्छ करीत सार्वजनिक स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्व समाजात रुजवण्यासाठी त्यांनी सक्रिय राहून प्रयत्न केले स्वच्छता हे घराचे भूषण हा संस्कार बालपणी त्यांना त्यांच्या आईकडून या11मिळाला मोठेपणी हातात खराटा घेऊन लोकांच्या पायाखालील जमीन रस्ते स्वच्छ करत त्यांच्या आईचा शब्द घरदार स्वच्छ असेल तर मन देखील स्वच्छ राहते. स्वच्छता म्हणजे परमेश्वर, प्रसन्नता, आनंद, आरोग्य, सह जीवनातील सुख ईश्वराची आराधना गाडगेबाबांनी भुकेल्यांना अन्न द्या तहानलेल्यांना पाणी द्या उघड्या नागड्यांना वस्त्र द्या बेघरांना आसरा द्या निराश झालेल्यांना हिम्मत द्या गरीब मुला मुलींना शिक्षण द्या अंध पंगुना औषध द्या जातिभेद व अस्पृश्यता काढू नका मुक्या प्राण्यांना अभय द्या गरीब आणि मुले मुलींचे लग्न लावून द्या बेरोजगारांना रोजगार द्या हीच खरी देवाची भक्ती आहे व देवाची पूजा आहे हेच बाबांचे तत्त्वज्ञान पसायदान आहे अशा या स्वच्छता शिक्षण व समाजसेवा यासाठी महान कार्य करणाऱ्या थोर संत गाडगेबाबा यांना यावेळी उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले .


