वाणिज्य विभागातर्फे रेल्वे कुलींना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील रेल्‍वे स्‍थानकावर हमाली करुन आपली व कुटुंबाची उपजिविका चालविणा-या कुली बांधवांना लाॅकडाऊन मुळे उपाशीपोटी राहण्‍याची वेळ आली आहे . यासाठी भुसावळ रेल्‍वे वाणिज्य विभागातर्फे कुली लोकांना जिवनावश्‍यक साहित्‍यांचे वाटप करण्यात आले.
मंडळ रेल्‍वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार वाणिज्य विभागातर्फे भुसावळ पार्सल कार्यालयात भुसावळ रेल्‍वे स्थानकावरील गरजू अशा ५१ कुलींना वाणिज्‍य निरीक्षक जीवन चौधरी व अन्‍य मान्‍यवरांच्‍या हस्‍ते जीवनावश्यक वस्तू,राशन सामान वाटप करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने सोशल डिस्टनसिंग नियमाचा काटेकोर वापर करण्यात आला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *