भुसावळ : दीपनगर प्रकल्पातील 660 प्रकल्पातील एमबीपीएल कंपनीत सर्व्हीसिंग करण्यासाठी आलेल्या अभियंत्यांचा जीन्यावरून उतरताना चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 17 रोजी सकाळी 11.20 वाजता घडली.
दीपनगरातील एमबीपीएल कंपनीच्या मशिनरीचे सर्व्हिसिंगसाठी अभियंता सुरेद्र परब व सहकारी राजाराम साळुंखे हे दोन्ही आले. काम आटोपून ते जीन्यातून खाली उतरत असताना परब यांना चक्कर आल्याने कोसळले. अन्य कर्मचार्यांनी खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले. परब यांचा मृतदेह ट्रामा केअर सेंटरला नेण्यात आल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार युनूस शेख करीत आहेत.



