अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त : वरणगाव पोलिसांची कारवाई ;


भुसावळ – तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ऑडर्नन्स फॅक्टरी मेन गेट साई मंदीराजवळ वरणगाव येथे अमर परदेशी हा अवैध गावठी कट्टा बाळगुन दहशत निर्माण करीत आहे,त्यांनी तात्काळ वरणगांव पोस्टेचे पोउनी रामदास गांगुर्डे, पोलीस हवालदार यासिन पिंजारी, प्रेमचंद सपकाळे, प्रशांत ठाकुर,ईश्वर तायडे, विजय बावस्कर अशांना दालनात बोलावून सदर बाबत खात्री करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले असता पथकाने संशयितांकडून अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले.

त्याप्रमाणे पथक सदर ठिकाणी जावून खात्री केली असता एक ईसम हा संशयीतरित्या हालचाल करीत असताना दिसला.त्यांची खात्री झाल्याने पथकाने दोन वाजून वीस मिनिटांनी छापा टाकुन त्यास जागीच पकडे असता त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव अमर मधुकर कहार ऊर्फ परदेशी वय-30 रा.चांगदेव ता.मुक्ताईनगर असे सांगितले. संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या कमरेला पाठीमागील बाजुस अवैध गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस असे एकूण चोवीस हजार रुपये किंमतीचे मिळून आले.वरणगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे याचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव पोउप निरीक्षक रामदास गागुर्डे, पोलीस हवालदार यासिन पिंजारी, प्रेमचंद सपकाळे, प्रशांत ठाकुर,ईश्वर तायडे, विजय बावस्कर अशांनी केली आहे.