भुसावळ – मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा येथील गट 167 पैकी 51, 36, 27 या मधील वर्ग 2चे वर्ग 1 मध्ये रूपांतर करतांना पंकज लोखंडे व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचार्यांनी मिळून शासनाची फसवणूक केली. याबाबत सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी कारवाईबाबत अप्पर मुख्य सचिव व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व तहसीलदार मुक्ताईनगर यांच्याकडे तक्रर अर्ज दाखल केला होता. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने दि. 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. या उपोषणाची दखल घेत जिल्हा दंडाधिकारी कार्यालय गृह शाखा यांनी तहसीलदार महसुल यांना पत्र क्र. दंडप्र-04/कवि/2024 दि. 26/1/2025 ने उपारोक्त विषयान्वये, अर्जदार सानप यांनी दि.2/1/2025 रोजीचे निवेदन देवून जिल्हाधिकारी कार्यालयातील पंकज लोखंडे तत्कालीन तहसीलदार महसुल व वरिष्ठ अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यातबाबत निवेदन दिले तसेच निवेदनावर नियमानुसार तत्काळ कार्यवाही करावी , तसेच उपोषण मागे घेण्याबाबत सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप भुसावळ यांना जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या वतीने गृह शाखेने पत्र दिले आहे. या लेखी आश्वासनानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी उपोषण मागे घेतले आहे .