भुसावळ (प्रतिनिधी )-
राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रेरणेतून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा.श्रीमती रक्षा खडसे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब मजूर, कामगार, निराधार यांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. याकामी रेल्वेच्या आयआरसीटीसी विभागाचे सहकार्य मिळाले आहे. दररोज दिड हजार जेवण फूड पॅकेट वितरित करण्यात येणार आहे. या अंतर्गत दि.३१ मार्च मंगळवार रोजी नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी,नगरसेवक राजू नाटकर,नगरसेविका सोनी बारसे यांच्या प्रभागांमध्ये अन्नदान करण्यात आले.आज पासून १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असेपर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.आजच्या अन्नदान कार्यक्रमा प्रसंगी आमदार संजय सावकारे,नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे,शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस पवन बुंदेले,अनिकेत पाटील, राजू खरारे,सुमित बहा-टे ,पृथ्वीराज पाटील,संतोष बारसे,गिरीश महाजन,नंदकिशोर बडगुजर, नारायण रणधीर,विनू रणधीर, बिसन गोहर आदी पदाधिकारी उपस्थित होते.



