भुसावळ- (प्रतिनिधी )-
“एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा ” प्रेरणेतून आपण सुद्धा सामाजिक दायित्व निभवावे या विचारांनी अल्पशी का होईना गरजु गोरगरिबांना
मदत व्हावी यासाठी येथील शिवाजी नगर श्रीकृष्ण गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी गरजु गोरगरिबांना बिस्कीटस, पाण्याची बाटली, केळी ,शिवाय आरोग्याची सुरक्षा यासाठी सॅनीटायझर, डेटॉल साबण ,अशा वस्तू वाटप करण्यात आल्यां .
यासाठी श्रीकृष्ण गणेश मंडळाने सहकार्य केले तर
सतिश मेंडपल्ली, रोहित जाधव, शैलेश पवार, मयुर माळी, अमित बागले, सुरज शर्मा, निक्की खैरनार, अभिषेक गौर, अतुल बागले, गोविंदा बोरसे, आकाश गौर ,आदींनी परिश्रम घेतले.



