छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -आसनसोल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस -गोडा एक्सप्रेस आता सुधारित रचनेने धावणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पटना एक्सप्रेस सुधारित गाडी क्रमांक आणि रचनेने धावणार ; प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी :

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -आसनसोल एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस -गोडा एक्सप्रेस आता सुधारित रचनेने धावणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पटना एक्सप्रेस सुधारित गाडी क्रमांक आणि रचनेने धावणार आहे

रेल्वे प्रशासनाने खालील गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पटना सुपरफास्ट एक्सप्रेस
82356 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पटना सुपरफास्ट एक्सप्रेस 04 मार्च 2025 पासून सुधारित गाडी क्रमांक 22360 सह धावेल.
82355 पटना – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस 02 मार्च 2025 पासून सुधारित गाडी क्रमांक 22359 सह धावेल.

सुधारित रचना (22360/22359):
2 वातानुकूलित द्वितीय, 5 वातानुकूलित तृतीय, 5 तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, 6 स्लीपर क्लास ,1 गार्ड्स ब्रेक व्हॅन, 1 एसी पँट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आसनसोल एक्सप्रेस
12362 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -आसनसोल एक्सप्रेस 22 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धावेल.
12361 आसनसोल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस 19 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने आसनसोल येथून धावायला सुरुवात झाली आहे.
सुधारित रचना (12362/12361):
2 वातानुकूलित द्वितीय, 6 वातानुकूलित तृतीय, 7 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास, 1 गार्ड्स ब्रेक व्हॅन, 1 एसी पँट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन.

लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस व लोकमान्य टिळक टर्मिनस -गोडा एक्सप्रेस
12336/12335 लोकमान्य टिळक टर्मिनस -भागलपूर एक्सप्रेस 19 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने लोकमान्य टिळक टर्मिनस येथून व 17 जानेवारी 2025 पासून भागलपूर येथून धावत आहे.
22312 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोडा एक्सप्रेस 23 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने एलटीटी येथून धावेल.
22311 गोडा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 19 जानेवारी 2025 पासून सुधारित रचनेने गोडा येथून धावत आहे.

सुधारित रचना (12336/12335 व 22312/22311):
2 वातानुकूलित द्वितीय, 5 वातानुकूलित तृतीय, 8 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास, 1 गार्ड्स ब्रेक व्हॅन,1 एसी पँट्री कार आणि 1 जनरेटर व्हॅन.

प्रवाशांनी तिकीट आरक्षणापूर्वी या बदलांची नोंद घ्यावी. गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा