वरणगाव रनमध्ये भुसावळ रनर्सच्या सीमा पाटील, रीना परदेशी व गुंजन गुप्ता विजयी”


भुसावळ – वरणगाव सिविल सोसायटीतर्फे आयोजित रन फॉर वरणगाव या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ५७ धावपटूंनी यशस्वी सहभाग घेतला. त्यापैकी ५ किमीच्या महिला गटात गुंजन गुप्ता प्रथम स्थानी विजयी ठरल्या. तर १० किमीच्या महिला गटात रीना परदेशी द्वितीय स्थानी व सीमा पाटील या प्रथम स्थानी विजयी ठरल्या. त्यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थित सर्व भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंनी मोठा जल्लोष केला. बक्षीस वितरणावेळी व्यासपीठावर उपस्थित स्पर्धेचे मुख्य अतिथी प्रा प्रविण फालक, स्पर्धेचे सदिच्छादूत विजय फिरके व प्रविण पाटील यांनी देखील विजयी धावपटूंचे अभिनंदन केले.
या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन वरणगाव शहरातील नागरिकांना प्रोत्साहित केल्याबद्दल स्पर्धेचे आयोजक डॉ राहुल भोईटे व इतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या वेळी डॉ तुषार पाटील, गणसिंग पाटील, डॉ नीलिमा नेहेते, डॉ चारुलता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.